चेन्नई (तामिळनाडू): कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावांमध्ये जंतुनाशकांची फवारणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी अरुंद गल्ल्या आणि गर्दीने भरलेल्या वस्त्यांमध्ये जंतुनाशक फवारणीचे वाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. तामिळनाडूतील अशी ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी जंतूनाशक स्प्रेयर-फिट केलेल्या नवीन मोटारसायकल तयार करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज या मोटारसायकलींचे उद्घाटन केले.
अरूंद गल्ल्यांमध्ये जंतूनाशक फवारणीसाठी आता होणार रॉयल एनफील्डचा वापर!
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावांमध्ये जंतूनाशकांची फवारणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी अरुंद गल्ल्या आणि गर्दीने भरलेल्या वस्त्यांमध्ये जंतूनाशक फवारणीचे वाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. तामिळनाडूतील अशी ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक स्प्रेयर-फिट केलेल्या नवीन मोटारसायकली तयार करण्यात आल्या आहेत.
कोविड-१९ साठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून या मोटारसायकलींची निर्मिती केली आहे. अग्निशामक दल आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यासाठी या गाड्या दिल्या गेल्या.
प्रत्येकी 1.35 कोटी रुपये किंमत असलेल्या नऊ रॉयल एनफील्ड गाड्यांमध्ये बदल करून जंतूनाशक फवारणी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. पलानीस्वामी यांनी आज अशा नऊ गाड्यांचे अनावरण केले. तामिळनाडूतील अग्निशामक दल राज्यभरातील निर्जंतुकीकरणाच्या कार्यात सामील झालेले आहे. त्यांनी आत्तापर्यंत रुग्णालये आणि बाजारांसह सुमारे 45 हजार ठिकाणांची स्वच्छता केली आहे.