महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळात बाहेरून येणाऱ्यांना अलगीकरणासाठी लागणार शुल्क; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वाद - केरळ कोरोना अपडेट

केरळातील अनेक नागरिक परदेशातून आले आहेत. त्यांच्यामुळे कोव्हिड -19 च्या प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन म्हटले आहे. यानंतर त्यांनी मंगळवारी अचानकपणे यापुढे या नागरिकांना अलगीकरणात ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी घोषणा केली.

cm pinarayi vijayan
मुख्यमंत्री पिनरयी विजयन

By

Published : May 27, 2020, 11:55 AM IST

तिरुवनंतपुरम -केरळातील अनेक नागरिक परदेशातून आले आहेत. त्यांच्यामुळे कोव्हिड-19 च्या प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन म्हटले आहे. यानंतर त्यांनी मंगळवारी अचानकपणे यापुढे या नागरिकांना अलगीकरणात ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी घोषणा केली. याचे दर सर्वांना परवडतील असेच असतील. हा नियम बुधवारपासून लागू होईल, असे ते म्हणाले.

अलगीकरणाच्याच्या नियमांनुसार, परदेशातून परत आलेल्या सर्वांना एका आठवड्यासाठी संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जाते. त्यानंतर दुसर्‍या आठवड्यात त्यांना त्यांच्या घरी अलगीकरणात रहावे लागते.

विजयन यांच्या घोषणेवर लोकसभेचे ज्येष्ठ सदस्य आणि रासप नेते एन. के. प्रेमाचंद्रन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘राज्य सरकारने केरळ उच्च न्यायालयाला परदेशातून परत येणाऱ्यांसाठी अलगीकरणाची पुरेशी व्यवस्था असल्याचे सांगितले होते. सरकारने 2.35 लाख बेडची तयारी केल्याचे आणि 1.53 लाख बेड तातडीने तयार असल्याचे सांगितले होते. तसेच, खासगी हॉटेलमध्ये पैसे देऊन राहण्यास इच्छुक असलेल्यांसाठी 9 हजार खोल्या ठेवल्याचेही म्हटले होते. आतापर्यंत तर केवळ 11 हजार लोक परदेशातून आले आहेत. तरीही विजयन त्यांनी पैसे देण्यास भाग पाडत आहेत,’ असे ते म्हणाले.

राज्यातील एकमेव माकपचे लोकसभा सदस्य ए.एम. अरिफ यांनी ‘केरळ हे लहान आणि निधीग्रस्त राज्य आहे. येथे महसूलही कमी आहे. येतील संसाधनेही मर्यादित आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी याआधी केलेल्या घोषणा आणि बेडची उपलब्धता, इतर आवश्यक बाबींचा पुरवठा याविषयी दिलेल्या माहितीनंतर हे सर्व कसे पुरवता येईल, यावर मी विचार करत होतो,’ असे म्हटले आहे.

यूएई येथील टी. के. आशिक यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेविषयी आपल्याला आश्चर्य वाटल्याचे म्हटले आहे. "काही काळापूर्वी भेटीसाठी आले असता केलेल्या स्वागतात विजयन यांनी काय म्हटले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. ते इतके जोरदारपणे म्हणाले होते की बाहेरून केरळला परत आलेल्या व्यक्तींना राज्य सरकार सहा महिन्यांचा पगार देईल. नोकरी गमावून घरी परतावे लागले तरी काळजी करू नये. मात्र, आता ते सांगत आहेत, प्रत्येक बाहेरून येणाऱ्याला अलगीकरणासाठी पैसे द्यावे लागतील,"असे ते म्हणले.

सध्या राज्यात 415 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातील 231 जण मागील चार दिवसांत सापडले आहेत. तर, मंगळवारी यापैकी सर्वाधिक 67 सापडले, अशा माहिती विजयन यांनी दिली. यापैकी 133 परदेशातून आणि 178 इतर राज्यांतून आले आहेत, असे ते म्हणाले. इतर राज्यातून नोंदणी करणारे एक लाखाहून अधिक लोक परत आले आहेत. परदेशातून नोंदविण्यात आलेल्या 1.35 लाखांपैकी 11 हजार 189 जण परत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दिवसभरात राज्यात आणखी 9 हॉटस्पॉट घोषित केले आहेत. एकूण हॉटस्पॉटची संख्या 68 झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details