राउरकेला -ओडिशाच्या राउरकेला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सौम्या मिश्रा यांनी दाखवलेल्या प्रसंगावअधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सौम्या यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून तातडीने रुग्णालयात हलवले.
महिला पोलीस अधीक्षकाने अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल - राउरकेला पोलीस अधीक्षक
ओडिशाच्या राउरकेला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सौम्या मिश्रा यांनी दाखवलेल्या प्रसंगावअधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सौम्या यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून तातडीने रुग्णालयात हलवले.
बिजू एक्स्प्रेस वेवर सायकलवरून जात असताना राजेंद्र किस्पेता या व्यक्तीला दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर राजेंद्र गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक लोकांकडून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतीही व्यवस्था होत नव्हती.
त्यादरम्यान, पोलीस अधीक्षक सौम्या सुंदरगडहून कारमध्ये आपल्या ऑफिसकडे येत होत्या. घटनास्थळी गर्दी बघताच त्यांनी गोडी थांबवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच काही सहकाऱ्यांच्या मदतीने राजेंद्र यांना आपल्या गाडीतून रुग्णालयात पाठवले.