महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 14, 2020, 2:22 PM IST

ETV Bharat / bharat

कोलकात्यात शक्तिशाली स्फोट, क्लबचे छत कोसळले

कोलकाताच्या बेलेघाटा भागात मंगळवारी झालेल्या एका मोठ्या स्फोटात क्लबच्या इमारतीची छत आणि भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीत कोणत्याही प्रकारचे स्फोटक साहित्य ठेवण्यात आले होते का, याचा पोलीस शोध घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

कोलकात्यात शक्तिशाली स्फोट
कोलकात्यात शक्तिशाली स्फोट

कोलकाता - कोलकाताच्या बेलेघाटा भागात मंगळवारी झालेल्या एका मोठ्या स्फोटात क्लबच्या इमारतीची छत आणि भिंत कोसळली. पोलिसांनी सांगितले की, गांधीमठ फ्रेंड्स सर्कल क्लबच्या पहिल्या मजल्यावरील ही घटना पहाटेच्या वेळी घडली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोलकाताचे पोलीस उपायुक्त (पूर्व उपनगरी विभाग) अजय प्रसाद घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा -महिलांचे संरक्षण आणि नातेवाईकांना सावध करणार हा 'स्मार्ट चाकू'

'आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. श्वान पथकाला बोलावण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची चौकशी करेल. कसून चौकशी करण्यापूर्वी या स्फोटाबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. एका फॉरेन्सिक टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे,' असे अजय प्रसाद म्हणाले.

या इमारतीत कोणत्याही प्रकारचे स्फोटक साहित्य ठेवण्यात आले होते का, याचा पोलीस शोध घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा -काश्मीरमध्ये धार्मिक शाळेतील 3 शिक्षकांवर पीएसएअंतर्गत कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details