महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडूत आसरा मिळाल्याने खुश आहेत रोहिंग्या निर्वासित!

तामिळनाडूतील केलांबक्कम रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांच्या कॅम्पमध्ये सध्या रमजान ईदमुळे आनंदाचे वातावरण दिसत आहे. येथे शेकडो रोहिंग्या निर्वासित राहत आहेत. रोजा तोडण्यासाठी सर्वजण विविध पदार्थ बनवतात आणि आपल्या शेजाऱ्यांनाही बोलावतात. खासकरून चुलीवर बनवलेल्या शेवया सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे, अशी माहिती कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद आयूब यांनी दिली.

Rohingyas in Tamilnadu
तामीळनाडू रोहिंग्या

By

Published : May 8, 2020, 2:10 PM IST

चेन्नई - तामिळनाडूतील केलांबक्कम रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांच्या कॅम्पमध्ये सध्या रमजान ईदमुळे आनंदाचे वातावरण दिसत आहे. कॅम्पमध्ये असलेले शेकडो पुरुष रमजान निमित्त दररोज रोजा तोडण्यासाठी गोड लापशी बनवत आहेत.

रमजानमुळे सध्या कॅम्पमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोजा तोडण्यासाठी सर्वजण विविध पदार्थ बनवतात आणि आपल्या शेजाऱ्यांनाही बोलावतात. खासकरुन चुलीवर बनवलेल्या शेवया सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे, अशी माहिती कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद आयुब यांनी दिली.

22 वर्षीय आयुब सध्या एका चिकन दुकानात काम करत आहे. म्यानमारमध्ये अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर आत्ता कुठे जरा शांत जीवन जगण्यास मिळत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे ठेवून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करत असल्याचे आयुबने सांगितले.

२०१६ मध्ये आयुब तामिळनाडूमध्ये आला होता. "सध्याच्या कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. मी मात्र, सकाळीपासून दुपारपर्यंत काम करतो. महिन्याला १० हजार रुपये मिळतात. म्यानमारमधील वाईट वातावरणापेक्षा तामिळनाडू कित्येकपटींनी शांत आणि चांगले आहे," असेही आयुबने सांगितले.

रोहिंग्या कॅम्पमधील अनेक पुरुष स्थानिक चिकन दुकानांवर काम करतात तर काही छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये काम करतात. स्थानिक प्रशासनातर्फे या सर्वांना येथे राहण्याचा परवाना देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details