लखनौ -लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर समाजवादी पक्ष, बसप आणि आरएलडीच्या जनसभेमध्ये आज अचानक बैल घुसल्याने खळबळ उडाली. त्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश कुमार यांनी मुख्यमंत्री योगी यांना फैलावर घेतले. यानंतर उपस्थितांची काही वेळ उडालेली तारांबळ हसण्यात परिवर्तीत झाली.
अखिलेश यादवांच्या सभेत घुसला बैल; त्यावरून योगींना असे झापले की पोट धरून हसाल
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांनतर सर्वच पक्ष उरलेल्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी करत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशात आज आघाडी पक्षांची सभा होती
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांनतर सर्वच पक्ष उरलेल्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी करत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशात आज आघाडी पक्षांची सभा होती. ही सभा सुरू होताच सभेत बैल घुसला यामुळे सर्वांची पळापळ झाली होती.
यावेळी त्या बैलाने जवळच काम करणाऱ्या एका मजूराला टक्कर दिली. तर, एका पोलिसाच्या मागेही तो लागला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण सभेत लोक पोट धरून हसत होते.
आपल्या हेलिकॉप्टरचा आवाज ऐकून त्या बैलाला वाटले असावे आपले मालक आले आहेत. त्यांना आपण आपला त्रास सांगू म्हणून तो बैल सभेत घुसला असावा. त्यामुळे हरदोईच्या लोकांनी अशा घुसखोरांपासून वाचण्यासाठी सावध रहावे, असे अखिलेश यावेळी म्हणाले.