कोविड-१९वरील जागतिक युद्ध सध्या सुरू असताना, काही देशांमधील आरोग्य सेवक विषाणुचा प्रसार टाळण्यासाठी रोबोंचा वापर करत आहेत. अशा विशेष रोबोंचा तपशील खाली दिल्याप्रमाणे आहे..
- पृष्ठभागावरील विषाणुला जाळून खाक करण्यासाठी अतिनील किरणांचा वापर..
विषाणुला बंद करणारा म्हणून ओळखला जाणारा रोबो, रूग्णालयाच्या खोल्यांमध्ये त्याच्या पद्धतीने काम करतो. या रोबोमधून, अतिनील किरणे वेळोवेळी निघतात आणि रूग्णालयाच्या फरशीवरील विषाणुना नष्ट करतात.
- ५-जीच्या माध्यमातून टेलिमेडिसिनला मदत करणारा रोबो..
या अत्यंत आधुनिक रोबोच्या मदतीने, डॉक्टर्स स्वतः रूग्णालयातच राहून दूरवरच्या भागातील रूग्णांच्या निदानाचे विश्लेषण करू शकतात. त्यांच्या वापराच्या माध्यमातून,पुढील वैद्यकीय सेवाही पुरवल्या जातात.
चीनची राजधानी बिजिंगच्या झिन्हुआ विद्यापीठात रोबो या मदतीच्या हाताचे उत्पादन करण्यात आले आहे. रूग्णाला खाटेपर्यंत नेऊन झोपवले जाते आणि रोबोटिक हात त्याच्या तोंडातून डाग लागलेला बोळा काढतो. तसेच तो अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग करतो. नंतर डॉक्टर्स त्या माहितीचे विश्लेषण करतात आणि रूग्णाला कोणते उपचार द्यायचे, याचा निर्णय करतात.
- रोबो - गस्त घालणारा मित्र..
चीनी कंपनी क्लाऊड माइंड्स या कंपनीने हा रोबो उत्पादित केला आहे. हा रोबो रुग्णालयात येणार्यांचे तपमानाची माहिती घेण्यात मदत करतो, त्यांना ओळखण्यासाठी सहाय्य करतो आणि रूग्ण जेथे जेथे फिरलेला असेल ती जागा स्वच्छ करण्यातही सहाय्य करतो.
- भारतातही प्रगतीचे प्रयोग..
भारतातही आता रूग्णालयांची स्वच्छता, रूग्णांना वैद्यकीय औषधे देणे, अन्न देणे आणि संशयित व्यक्ति किंवा रूग्णाच्या तपमानाची नोदं करणे यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत.
- जयपूर शहरात, जे राजस्थानची राजधानी आहे, स्वामी मानसिंग रूग्णालयाच्या कर्मचार्यांनी उपचारर सुरू असलेल्या संसर्गग्रस्त कोविड-१९ रूग्णांना औषधे आणि जेवण देणे अशा कामांसाठी नियमित अंतराने रोबोंचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे.
- ऑसिमोव रोबोटिक्स या केरळमधील स्टार्टअपने, रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या कोविड-१९ रूग्णांना सहाय्य करण्यासाठी ३ चाकांचा रोबो तयार केला आहे.
हेही वाचा :ब्रिटनकडून मोदींचे अनुकरण; वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठी 'क्लॅप फॉर केअर्स'