भुवनेश्वर - ओरिसातील भुवनेश्वर येथे एका हॉटेलमध्ये रोबोट ग्राहकांना जेवण वाढण्याचे काम करणार आहे. या उपहारगृहामध्ये चंपा आणि चमेली नावाचे दोन देशी बनावटीचे रोबोट ग्राहकांची सेवा करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलमधील प्रसन्न वातावरण, चविष्ट जेवणाशिवाय रोबोटकडून आदरातिथ्य मिळणार आहे.
हेही वाचा-हरियाणा विधानसभा: पाकिस्तानला जाणारं पाणी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणार - पंतप्रधान मोदी
हा भन्नाट डिजिटल अनुभव भुवनेश्वर शहरातील 'रोबो शेफ' या हॉटेलमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. शहरातील इन्फोसिटी भागामध्ये रोबो शेफ हॉटेल आहे. हे दोन्ही रोबोट रडार तंत्रज्ञानावर काम करणारे असून आवाज एकून ते सूचनांचे पालन करू शकतात. विविध भाषांसह स्थानिक ओडिया भाषेमध्येही हे रोबोट ग्राहकांचे स्वागत करु शकणार आहेत. तसेच हे दोन्ही रोबोट देशी बनावटीचे आहेत.