गुरुग्राम - देशभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. मात्र त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुग्राम आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी खास व्यवस्था केली आहे. गुरुग्राम येथील सेक्टर १० मधील रुग्णालयात कोरोना बाधितांची काळजी घेण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात येत आहे.
हरियाणात रोबोटच्या मदतीनं कोरोनाबाधित रुग्णांची घेण्यात येतेय काळजी
गुरुग्राम येथील सेक्टर १०मधील रुग्णालयात कोरोना बाधितांची काळजी घेण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात येत आहे.
हा रोबाट रुग्णांना गोळ्या औषधांसह जेवन घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सेक्टर १० च्या आयसोलेशन विभागात कारोनाबाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी रोबोचा वापर करण्यात येत आहे. हा रोबोट सहायक डॉक्टर प्रमाणे मुख्य डॉक्टरांची मदत करणार आहे. दी हायटेक रोबोटिक्स कंपनीकडून गुरुग्राम जिल्हा प्रशासनाला हा रोबोट निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर १० तासापर्यंत काम करू शकतो
हा रोबोट एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांपर्यंत काम करू शकतो. एकाचवेळी हा रोबट बरीच कामं करू शकतो. एकापेक्षा जास्त कमांड दिल्यानंतर देखील हा रोबोट एकाच वेळी संपूर्ण काम पूर्ण करू शकतो.
लेझर गायडन्स तंत्राचा उपयोग
सेक्टर १०च्या रुग्णालयातील या रोबोटला लेझर गायडन्स तंत्राने विकसित करण्यात आले आहे. ज्या जागेवर त्याला इंस्टॉल केले जाते त्या ठिकाणचा संपूर्ण नकाशा त्यामध्ये फिट होतो. त्यानंतर गरजे प्रमाणे त्याला कमांड देऊन त्याच्याकडून काम करून घेतले जाऊ शकते. जर काम करताना काही अडचण निर्माण झाली तर सायरन वाजवून धोक्याची सूचना दिली जाते.