नवी दिल्ली- आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वड्रा आज ईडीसमोर चौथ्यांदा हजर झाले. याप्रकरणी त्यांची आधी ईडीकडून ३ वेळा चौकशी झाली आहे. मात्र, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वड्रा यांनी लंडनमध्ये कोणत्याही प्रकारची संपत्ती नसल्याचे सांगितले आहे. संजय भंडारी आणि आपला काहीही संबंध नाही. तसेच मनोज अरोरा यांनाही ओळखत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वड्रा ईडीसमोर चौथ्यांदा हजर - लंडन
लंडनमध्ये कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही. संजय भंडारी याचाशी आपला काहीही संबंध नाही. तसेच मनोज अरोरा यांनाही ओळखत असल्याचे वड्रा यांनी म्हटले आहे.
अरोरा यांच्या माध्यमातूनच वड्रा यांनी लंडनमध्ये संपत्ती खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भंडारी हे सिंटेक इंटरनॅशनल या कंपनीचे मालक आहेत. लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेयर परिसरातील १७.६१ कोटी रुपयांची जमीन वाड्रा यांनी पैशांची अफरातफर करुन खरेदी केलाचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. शिवाय या व्यवहारात आपण सहभागी नसल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाकडून वाड्रा यांना याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने २ मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. शिवाय चौकशीदरम्यान सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे. वड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी यांचा नुकता सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.