नवी दिल्ली - प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सोमवारी उत्तरप्रदेशमध्ये रोड शो करत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. या पार्श्वभुमीवर प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांकाला देशातील जनतेच्या हवाली करत असल्याचे सांगत तिला सुरक्षित ठेवण्याचे भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये हे मत व्यक्त केले.
प्रियांकाला देशातील जनतेच्या हवाली करत आहे, तिला सुरक्षित ठेवा - रॉबर्ट वाड्रा - प्रियांका गांधी वाड्रा
प्रियांका गांधींना शुभेच्छा देताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, की भारताच्या जनतेची सेवा करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेल्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा. सध्या देशात द्वेषाचे आणि सुडाच्या राजकारणाचे वातावरण आहे. मात्र, जनतेची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे हे मला माहिती आहे. आता आम्ही तुला देशाच्या जनतेच्या हवाली करत आहोत. हे सांगताना त्यांनी जनतेला प्रियांकाला सुरक्षित ठेवण्याचे भावनिक आवाहनही केले.

संबंधित पोस्टमध्ये वाड्रा यांनी पत्नी प्रियांका आपली सर्वोत्तम मैत्रिण, परिपूर्ण पत्नी आणि आपल्या मुलांची सर्वोत्तम आई असल्याचेही नमूद केले आहे.