जयपूर - बिकानेर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. श्री डूंगरगड येथे झालेल्या बस व ट्रकच्या धडकेत जवळपास 25 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना बिकानेरच्या पीबीएम रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक व बसच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, तर 25 जखमी - राजस्थानमध्ये ट्रक व बसची धडक
रेवरी ते जेसलमेर राष्ट्रीय महामार्गावर बस व ट्रक यामध्ये समोरासमोर झालेल्या जबर धडकेत 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण जखमी आहेत.
![राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक व बसच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, तर 25 जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5098157-thumbnail-3x2-raj.jpg)
बस व ट्रक यांमध्ये समोरासमोर झालेल्या जबर धडकेत 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण जखमी आहेत.
या अपघातात बसचा चुराडा झाला असून, क्रेनच्या साहाय्याने वाहणे हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांना पाचारण करण्यात आले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग 11 हा हरियाणातील रेवरी ते राजस्थानमधील जेसलमेर या शहरांना जोडणारा रस्ता आहे.
Last Updated : Nov 18, 2019, 10:18 AM IST