नवी दिल्ली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिक मास्क आणि हातमोज्यांचा वापर करीत आहेत. बर्याच राज्यात, सरकारने तर सर्वांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. परंतु, असे बरेच लोक आहेत जे मास्क वापरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावताना दिसत नाहीत. वापर झाला की मास्क रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे.
COVID-19: उघड्यावर मास्क फेकणे धोक्याचे - डाॅ. गौतम कुमार - मास्क वापरणे
मास्क आणि ग्लोव्हज वापरल्यानंतर बरेच लोक ते उघड्यावर फेकतात. मात्र, असे करणे फारच धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. जर अशा मास्कशी कोणी संपर्कात आला, एखाद्याने त्याला स्पर्श केला. तर त्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याचा धोका असतो.
हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
मास्क आणि ग्लोव्हज वापरल्यानंतर बरेच लोक ते उघड्यावर फेकतात. मात्र, असे करणे फारच धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. जर अशा मास्कशी कोणी संपर्कात आला, एखाद्याने त्याला स्पर्श केला. तर त्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे मास्क आणि हातमोजे वापरल्यानंतर, प्रत्येकाने त्याला योग्यप्रकारे काढूण डस्टबिन किंवा एमसीडीच्या डस्टबिनमध्ये फेकले पाहिजे, असे आरएमल रुग्णालयाचे वरिष्ठ डाॅ. गौतम कुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.