पटना -बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) पक्षाला आज मोठा धक्का बसला. पक्षाच्या आठपैकी पाच आमदारांनी नितिश कुमार यांच्या सत्ताधारी जनता दल युनाईटेड(जेडीयू) पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला खिंडार पडली आहे.
आरजेडी पक्षाचे सचिव एस. एम. कमर आलाम यांच्यासह पाच आमदारांनी विधान परिषदेचे अध्यक्ष अवदेश नरेन यांच्याकडे राजीनामा सोपवला. संजय प्रसाद, राधा चरण सेठ, रनविजय कुमार सिंग आणि दिलीप राय या चार आमदारांनी राजीनामा दिला. जेडीयू पक्षातील प्रवेशाला अध्यक्ष नरेन यांनी परवानगी दिली.