महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बिहार सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट्सही नाहीत'

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी भिन्न आहे. यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसून गोंधळाची स्थिती असल्याची टीकाही यादव यांनी केली आहे.

'बिहार सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट्सही नाहीत'
'बिहार सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट्सही नाहीत'

By

Published : Jul 20, 2020, 12:38 PM IST

पाटणा- 'बिहार कोरोनाचे जागतिक हॉटस्पॉट ठरत आहे. राज्य सरकारला वाढत्या कोरोना रुग्णांची काहीच चिंता नाही. राज्यातील चाचण्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही', असा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

बिहारमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच राज्यातील मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनामुळे दररोज राज्यात मृत्यू होत आहेत. अशा काळातही राज्य सरकार काहीच विशेष पावले उचलत नसल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी भिन्न आहे. यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसून गोंधळाची स्थिती असल्याची टीकाही यादव यांनी केली आहे.

'कोरोना चाचण्याबांबतही मोठा गोंधळ उडाला आहे. लोकांनी सॅम्पल दिले नसूनही त्यांना कोरोनाचे अहवाल दिले जात आहेत. राज्यातील कोरोना वॉरिअर्स यात डॉक्टर, नर्स यांना पीपीई कीट्स दिले जात नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जनतेचे समाधान करावे', अशी मागणीही तेजस्वी यांनी केली आहे.

बिहारमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 379 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात 1412 नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याचे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details