नवी दिल्ली - एकीकडे कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या राजधानी दिल्लीत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेडसह वैद्यकीय सुविधांचा देखील तुटवडा निर्माण होत आहे. त्यातच आता एक सत्यतेची पडताळणी न केलेल्या परंतु समाजमाध्यमांवर चर्चेत असलेल्या दस्तऐवजानुसार, दिल्लीत कोरोनाचे उपचार महागणार असल्याचे म्हटले आहे. यानुसार दिल्लीतील कोणत्याही कोरोनाबाधित रूग्णासाठी उपचाराचे किमान शुल्क तीन लाख रुपये असणार, असे म्हटले आहे. या वृत्ताने सर्वसामान्य दिल्लीकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दिल्ली शहरातील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सरोज मेडिकल इन्स्टिट्यूट यांचे नाव असेलले परिपत्रक... हेही वाचा...देशातील महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली.. शिर्डीला प्रतीक्षा राज्य सरकारच्या आदेशाची
या पत्रकानुसार, रुग्णालयातील सर्वसाधारण वॉर्डातील एका बेडसाठी रुग्णाला दररोज चाळीस हजार रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच एक स्वतंत्र खोलीतील एका पलंगासाठी 50 हजार रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे आयसीयू बेडसाठी 75 हजार रुपयांची आवश्यकता असेल. त्यात रुग्णाला जर व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल तर तबब्ल एक लाखांपर्यंत शुल्क आकारले जाईल, असे या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात असेही नमुद केले आहे की, रुग्णाला प्रवेशाच्या वेळी सुमारे चार लाख रुपये आगाऊ जमा करावे लागती. ज्यात एका खोलीसाठी ही रक्कम एक लाख रुपये असे. तसेच जर रुग्णाला थेट आयसीयू सुविधेत दाखल केले तर तब्बल आठ लाख रुपये आगाऊ आकारले जातील, असेही यात नमुद केले आहे.
या परिपत्रकाची पडताळणी होऊ शकलेली नाही. मात्र, शहरातील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सरोज मेडिकल इन्स्टिट्यूट यांचे यावर नाव आहे.