मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कपूर कुटुंबीयांनी संदेश जारी केला आहे. आपले प्रिय ऋषी कपूर यांचे आज सकाळी ८.४५ वाजता निधन झाले. दोन वर्ष त्यांनी ल्यूकेमिया आजाराशी त्यांनी लढा दिला. शेवटी रुग्णालयात असतानाही ते सर्वांना हसवत राहिले, असे संदेशात म्हटले आहे.
'फॅमिली, फूड आणि फिल्म्स' ऋषी कपूर यांच्या जीवनात केंद्रस्थानी.... कपूर कुटुंबीयांचा संदेश - Rishi Kapoor passed away
दोन वर्ष उपचार घेत असतानाही तो आनंदी आणि उत्साही राहीला. जीवनाचा आनंद घेतला. फॅमिली, फूड, फिल्म्स या त्यांच्या आवडत्या गोष्टी होत्या.
दोन वर्ष उपचार घेत असतानाही ते आनंदी आणि उत्साही राहीले. जीवनाचा आनंद घेतला. फॅमिली, फूड, फिल्म्स या त्यांच्या आवडत्या गोष्टी होत्या. जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल ते कायम कृतज्ञता व्यक्त करत. ऋषी कपूर यांची आठवण अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नाही तर तुमच्या हास्यात ठेवावी, हे ऋषी कपूर यांनाही आवडेल.
ऋषी कपूर आपल्याला सोडून गेले असताना जग खूप कठीण काळातून जात आहे. लोकांनी एकत्र येण्यावर आणि प्रवासावर बंधणे आहेत. ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी या सर्व नियमांचे पालन करावे, असे संदेशात म्हटले आहे.