नवी दिल्ली - नागरी विमान उड्डान मंत्रालयाने कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंदी घातली आहे. 14 एप्रिलपर्यंत देशात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना 14 तारखेपर्यंत विमान प्रवास करता येणार नाही.
14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत विमानसेवा बंद - डीजीसीए - कोरोनाव्हायरस न्यूज
देशांतर्गत विमान सेवेसह आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. 29 मार्चपर्यंतच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता 14 तारखेपर्यंत सर्वच उड्डाने बंद ठेवण्यात आली आहेत.
देशांतर्गत विमान सेवेसह आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. 29 मार्चपर्यंतच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता 14 तारखेपर्यंत सर्वच उड्डाने बंद ठेवण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 15 लाख 24 हजार 266 नागरिकांची विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे.
देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण 700 पेक्षा जास्त झाले आहेत. तर हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार देशभर झाला असून सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळून आले आहेत. 67 नागरिक पूर्णत: बरे झाले आहेत. देशभरात कर्फ्यू लागू केल्यानंतर नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत देशात 17 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.