चंदोली (उत्तर प्रदेश) - मतदानाच्या एक दिवस आधीच आमच्या बोटावर जबरदस्तीने शाई लाऊन ५०० रुपये दिले, असा गंभीर आरोप चंदोलीमधील तारा जीवनपूर गावातील गावकऱ्यांनी केला आहे. आज येथे लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत असताना ही घटना समोर आली.
भाजपचा प्रताप..! मतदानापूर्वीच ५०० रुपये देऊन मतदारांच्या बोटावर लावली शाई; गावकऱ्यांचा आरोप - tara Jivanpur
उत्तर प्रदेशातील चंदोलीमधील तारा जीवनपूर गावातील गावकऱ्यांनी भाजपवर त्यांच्या बोटाला शाई लावल्याचा आरोप केला आहे.
![भाजपचा प्रताप..! मतदानापूर्वीच ५०० रुपये देऊन मतदारांच्या बोटावर लावली शाई; गावकऱ्यांचा आरोप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3326934-thumbnail-3x2-vil.jpg)
आमच्या बोटाला शाई लावणारे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांनी आम्हाला भाजपला मतदान करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर बळजबरीने त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली आणि म्हणाले आता तुम्ही मतदान करु शकणार नाही. हे कुणालाही सांगू नका, अशी धमकीही त्यांनी गावकऱ्यांना दिली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
ज्या गावकऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली, ते दलित वस्तीमध्ये राहतात. मतदानाच्या एक दिवस आधी येऊन तीन जणांनी शाई लाऊन पैसे वाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसा उल्लेखही एफआरआयमध्ये करण्यात आला असल्याने या मतदारांना मतदान करता येणार आहे.