महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंड हिमप्रलय : सुमारे 150 बेपत्ता, 10 जणांचा मृत्यू... - A glacier in Uttarakhand's Chamoli

उत्तराखंड
उत्तराखंड

By

Published : Feb 7, 2021, 6:02 PM IST

Updated : Feb 7, 2021, 10:29 PM IST

22:15 February 07

चमोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे. यामध्ये 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

19:27 February 07

मृताला दोन लाख तर जखमींना 50 रुपयांची आर्थिक मदत

उत्तराखंडच्या चमोली येथे जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केली. 

19:03 February 07

संपूर्ण देश उत्तराखंड सरकारसोबत - प्रियांका गांधी

प्रियांका गांधी यांचे टि्वट

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्वीट केले की, 'उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. या कठीण काळात संपूर्ण देश उत्तराखंडच्या पाठीशी उभा आहे. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना निवेदन आहे की त्यांनी मदत व बचाव कार्यात पूर्णपणे सहकार्य करावे.

19:00 February 07

यूपी सरकार संकटाच्यावेळी उत्तराखंड सरकारसोबत - योगी

संकटांच्या या काळात उत्तर प्रदेश सरकार उत्तराखंड सरकारच्या पाठीशी उभे आहे. गरज भासल्यास उत्तराखंड सरकारला सर्व आवश्यक मदत दिली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

19:00 February 07

केंद्राकडून मदतीचे आश्वासन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी पत्रकार  परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मदतीचे आश्वासन दिल्याचे रावत यांनी सांगितले.  बाधित भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

17:59 February 07

पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री सीएम त्रिवेंद्रसिंग रावत आपत्तीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्र्याचे आपत्तीच्या परिस्थितीवर लक्ष

17:51 February 07

सोनिया गांधींकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन

आयटीबीपीचे जवान लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तराखंडमधील संकटावर संवेदना व्यक्त केल्या. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते. बचाव कार्यात सहभागी व्हाव आणि पीडित लोकांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. 

17:50 February 07

निर्माणाधीन बोगद्यात 20 मजूर अडकले

आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे

उत्तराखंडमधील तपोवन धरणाशेजारी एक निर्माणाधीन बोगदा असून तेथे सुमारे 20 मजूर अडकले आहेत. घटनास्थळी तैनात आयटीबीपीच्या टीमकडून बचावकार्य चालू आहे. बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती एकत्रित करण्यासाठी आम्ही एनटीपीसीच्या व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधत आहोत, असे आयटीबीपीचे महासंचालक एस.एस.देसवाल यांनी सांगितले. 

17:50 February 07

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे टि्वट

राष्ट्रपतींचे टि्वट

दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे.  मदत आणि बचावकार्य योग्य प्रकारे चालू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी लोकांच्या कुशलतेची प्रार्थना केली. 

17:50 February 07

राहुल गांधींचे टि्वट

राहुल गांधींचे टि्वट

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. माझ्या सवेंदना उत्तराखंडमधील जनतेबरोबर आहेत. राज्य सरकारने सर्व पीडितांना तातडीने मदत करावी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्यात सहभाग घ्यावा.

17:50 February 07

150 जण वाहून गेल्याची भीती

 नदीमार्गातील सर्व गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमनदी फुटल्याने डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्यासह दगड मातीचा लोंढा खाली आला. यात 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

17:50 February 07

हेल्पलाइन क्रमांक जारी

राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी  हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. बाधित भागात अडकले असाल किंवा कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर 1070, 9557444486  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. 

17:50 February 07

आपत्ती निवारण पथकेही रवाना

जिल्ह्यातील जोशीमठ येथील बद्रीनाथ मार्गावर ही घटना घडली. पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आपत्ती निवारण पथकेही रवाना झाली आहेत. घटनास्थळाजवळील नागरिकांनी या पूराचा व्हिडिओ काढला असून यामध्ये पुराचे तांडव दिसत आहे.

17:50 February 07

ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान

संकाटाचे भयावह दृश्य

धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. लोकांच्या सुरक्षेचा विचार करता स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

17:39 February 07

उत्तराखंड हिमप्रलय लाईव्ह अपडेट्स

चामोली -चामोली उत्तराखंडमधील  चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे.  150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त  करण्यात येत आहे. तर आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आली आहे.  

Last Updated : Feb 7, 2021, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details