तिरूचिरापल्ली - तमिळनाडूमधील तिरुचिराप्पल्ली जिल्ह्यातील एका गावात जवळपास 25 फूट खोल बोअरवेलमध्ये एक मुलगा पडला आहे. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे.
सुजीत 25 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली होती. दरम्यान मुलगा सरकत 100 फूट खोल जाऊन अडकल्याची माहिती आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून बोअरवेलमध्ये कॅमेरा आणि ऑक्सिजन पाठवले आहे. गेल्या 57 तासांपासून दोन वर्षाचा सुजित विल्सन मृत्यूशी झुंज देत आहे.