नवी दिल्ली - ७१ वा प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख अतिथी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो हे राजपथवर उपस्थित आहेत. तीन्ही दलांकडून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली.
Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह.. राजपथावर संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन - Republic Day 2020
प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाला आहे.
![Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह.. राजपथावर संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन Republic Day celebration from delhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5845525-959-5845525-1580012170885.jpg)
राजपथवर संचलनाला सुरूवात झाली आहे. चित्ररथाबरोबरच लष्करी शक्तीचे परेडमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे, रणगाडे, स्पेशल फोर्स, लष्करी सामुग्रीचे प्रदर्शन करण्यात येत आहे. २२ राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून तेथील संस्कृती, विशेषत्व उपस्थित मान्यवरांसमोर सादर करणार आहेत. राजपथवर आयोजित परेडमध्ये तिन्ही दलांच्या तुकड्या सहभागी होणार आहेत. ही परेड पाहण्यासाठी नागरिकांनी राजपथवर गर्दी केली आहे.
परेडमध्ये सर्वप्रथम लष्कराची ६१ वी घोडेस्वारांची तुकडी सहभागी झाली आहे. सहा तुकड्या मिळवून १ ऑगस्ट १९५३ ला ही एक तुकडी तयार करण्यात आली. सहा पायदळ तुकड्या, पॅराशूट रेजिमेंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंट, शीख लाईट इंफट्री रेजिमेंट, कुमाउ रेजिमेंट, सिग्नल कोअर रेडिमेंटमधील पथके सहभागी झाल्या आहेत. त्यानंतर नौदल आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे.