महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना; रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना हटविण्याची मागणी - bridge

काँग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागितला आहे. आज सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास हा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रणदीप सुरजेवाला आणि पीयूष गोयल

By

Published : Mar 15, 2019, 12:08 AM IST

नवी दिल्ली - मुंबईतील सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात ३ महिलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जण जखमी झाले आहेत. यानंतर काँग्रेसने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागितला आहे. आज सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास हा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे, की एक तर गोयल यांनी स्वतः पदाचा राजीनामा द्यावा अथवा केंद्र सरकारने त्यांना पदावरून तत्काळ हटवावे.

या दुर्घटनेनंतर गोयल यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेऊन मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details