महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमधील सर्व धार्मिक स्थळे 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुली... - धार्मिक स्थळे

राजस्थानमधील सर्व धार्मिक स्थाने 1 सप्टेंबरपासून सामान्य भाविकांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक अंतर आणि आरोग्य प्रोटोकॉलची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेहलोत
गेहलोत

By

Published : Jul 31, 2020, 7:40 AM IST

नवी दिल्ली - राजस्थानमधील सर्व धार्मिक स्थळे १ सप्टेंबरपासून सामान्य भाविकांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी शासनाने देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद केली होती.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 31 ऑगस्टपर्यंत सर्व ग्रामपंचायतींना "ग्रामरक्षक" निवडण्याची सूचना केली आहे. हे ग्रामरक्षक पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय साधतील.

राजस्थानातील सर्व धार्मिक स्थळे 1 सप्टेंबरपासून भाविकांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, अशी माहिती राजस्थान सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक अंतर आणि आरोग्य प्रोटोकॉलची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार राजस्थानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 10 हजार 745 सक्रिय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details