नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे सर्वत्र उद्योगधद्यांना फटका बसत आहे. देशातली नामवंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनेही कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंदीमुळे रिलायन्स समुहातील कर्मचाऱ्यांचा पगार १० ते ५० टक्क्यांपर्यंत कापण्यात येईल.
२५ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशात मंदीचे वातावरण आहे. कारखाने, कार्यालये, विमान वाहतूक, रेल्वे ह्या गोष्टी ठप्प आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रिजने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीबाबत माहिती दिली आहे.