महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जीबी पंत रुग्णालयाचा कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार; नातेवाईकांचा आरोप - covid19 delhi news

कर्करोगाच्या उपचारासाठी एका व्यक्तीला जीबी पंत रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर बाबू जगजीवन राम रुग्णालयात त्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जीबी पंत रुग्णालयाने त्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊन घरी जाण्यास सांगितले.

relatives-of-cancer-and-corona-patient-accused-gb-pant-hospital-for-not-admiting-patient
कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास नकार?

By

Published : Jun 5, 2020, 5:35 PM IST

नवी दिल्ली-राजधानीतील जीबी पंत रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते जीबी पंत रुग्णालयावर आरोप करताना दिसत आहेत.

कर्करोगाच्या उपचारासाठी एका व्यक्तीला जीबी पंत रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर बाबू जगजीवन राम रुग्णालयात त्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जीबी पंत रुग्णालयाने त्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊन घरी जाण्यास सांगितले. रुग्णालयात उपचारासाठी बेड रिकामे आहेत तरिही उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिलाचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीतील सदस्यांनी एक व्हिडिओ बनवून केला आहे. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा-निसर्ग चक्रीवादळ: रायगडमधील थळमध्ये मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा

ABOUT THE AUTHOR

...view details