महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक..! लखनौत संपत्तीच्या वादावरून ६ जणांची हत्या - banthara police

अजय सिंह असे आरोपीचे नाव असून त्याने आपले पिता अमर सिंह, आई राम दुलारी, छोटा भाऊ अरून सिंह, त्याची पत्नी राम सखी आणि त्यांची मुले सौरभ आणि सारिका यांची हत्या केली आहे. सहामधील ५ जणांचे मृतदेह घराच्या आतमध्ये सापडलेत, तर एक मृतदेह घराच्या बाहेर आढळून आला.

UP murder caase
प्रतिकात्मक

By

Published : May 1, 2020, 1:12 PM IST

लखनौ- २६ वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबातील ६ व्यक्तींची हत्या केल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री गुडावली गावात घडली. विशेष म्हणजे, हत्या केल्या नंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या मुलाला बंथारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अजय सिंह असे आरोपीचे नाव असून त्याने आपले पिता अमर सिंह, आई राम दुलारी, छोटा भाऊ अरून सिंह, त्याची पत्नी राम सखी आणि त्यांची मुले सौरभ आणि सारिका यांची हत्या केली आहे. सहामधील ५ जणांचे शव घराच्या आतमध्ये सापडलेत तर एक शव घराच्या बाहेर आढळले आहे. अजयच्या वडिलांनी त्यांची संपत्ती अजयच्या भावाच्या नावी केली, त्यामुळे अजय नाराज होता, असे हत्ये मागचे कारण असावे असे प्रथम दर्शी दिसून येते. हत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी आरोपीला विचारणा केली जात असल्याचे पोलीस उपायुक्त दिनेश सिंह यांनी सांगितले.

या हत्येप्रकरणी अजयला पश्चाताप नाही. त्याने स्वत:हून आपला मुलगा अविनाशसह पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले, असे बंथाऱ्याचे स्टेशन हाऊस अधिकारी रमेश सिंह रावत यांनी सांगितले.

हेही वाचा-संरक्षण आणि एरोस्पेस विभागाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली बैठक..

ABOUT THE AUTHOR

...view details