नवी दिल्ली - येणार्या पिढ्यांसाठी पृथ्वी हे अधिक चांगले ठिकाण होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. हे मत त्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ट्विट करत व्यक्त केले आहे.
'पृथ्वीच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करण्याची प्रतिज्ञा घ्या' - Modi tweet on Environment day
हे वर्ष जैवविविधतेचे आहे. टाळेबंदीत आयुष्याची गती थंडावली आहे. असे असले तरी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी 'मन की बात' मध्ये म्हटले होते.
जागतिक पर्यावरण दिनाला, आम्ही पृथ्वीच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. चला आपण एकत्रितपणे शक्य तेवढे वनस्पती आणि प्राण्यांसाठी प्रयत्न करण्याची खात्री देऊ. पृथ्वीच्या भरभराटीत आपण त्यांना सामाईक करू, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नुकताच पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये जैवविविधतेविषयी व्यक्त केलेले विचारही व्हिडिओमधून शेअर केले आहेत. हे वर्ष जैवविविधतेचे आहे. टाळेबंदीत आयुष्याची गती थंडावली आहे. असे असले तरी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी 'मन की बात' मध्ये म्हटले होते. जनतेने झाडे लावावीत, असेही पंतप्रधान मोदींनी आवाहन केले. असे केल्याने निसर्गाबरोबर रोज नाते राहील, त्याचा विसर पडणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तापमान वाढत असताना पक्ष्यांना पाण्याची सुविधा देण्याचा विसर पडू देऊ नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.