तिरुअनंतपुरम - केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केरळमध्ये काही जिल्ह्यांना २० जुलै ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टी व धोक्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कसारगोड, ईडुक्की, कन्नूर, वायनाड, कोझीकोडे, मलप्पुरम इ. जिल्ह्यांमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आपत्तीजनक परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी केरळमधील विविध भागातून सात मच्छीमार बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता मच्छीमारांपैकी तीन जण निंदकरा जिल्ह्यातील कोल्लम येथील असून इतर चार जण तिरूअनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजमचे आहेत. राज्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या व अत्यावश्यक सामानासह सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.