नवी दिल्ली -स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्र भाजप वारंवार करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणाही केली होती. हाच मुद्दा लोकसभेमध्ये मांडला असता, यासाठी कोणत्याही औपचारिक मागणीची गरज नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कारासाठी कायम शिफारसी येत राहतात. मात्र, यामध्ये औपचारिक शिफारस करण्याची कोणतीही गरज नाही. भारतरत्न कोणाला द्यायचा याचा भारत सरकार योग्यवेळी निर्णय घेते, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.