नवी दिल्ली - काँग्रेसमधील वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये यावे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय) रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात या; आठवलेंचा सिब्बल आणि गुलाम नबी आझादांना सल्ला - Ramdas Athawale Kapil Sibal
भारतीय जनता पक्ष हा इथून पुढेही सत्तेत कायम असणार आहे. त्यामुळे, सिब्बल आणि आझादांनी ज्योतिरादित्य सिंधिंयांप्रमाणेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावे, येथे त्यांचे नेहमीच स्वागत असेल, असे आठवले यावेळी म्हणाले...
गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्षाच्या जडणघडणीसाठी, वाढीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मात्र, तरीही राहुल गांधी त्यांच्यावर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप करत आहेत. भारतीय जनता पक्ष हा इथून पुढेही सत्तेत कायम असणार आहे. त्यामुळे, सिब्बल आणि आझादांनी ज्योतिरादित्य सिंधिंयांप्रमाणेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावे, येथे त्यांचे नेहमीच स्वागत असेल, असे आठवले यावेळी म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींनी केलेली कथित टीका माध्यमांमध्ये गाजली होती. पक्षात मतभेद करणारे लोक भाजपच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, अशी टीका राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले होते, मात्र पक्षाने तातडीने राहुल असे काही बोलल्याचे नाकारले. तसेच, राहुल यांनीही कपिल सिब्बल यांच्यासोबत त्वरीत फोनवर चर्चा करुन त्यांचा गैरसमज दूर केला होता. सिब्बल यांनी त्यानंतर आपले नाराजीचे ट्विट मागे घेतले होते.