महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाड इमारत दुर्घटना : स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू; मोदींनीही व्यक्त केले दुः ख - पंतप्रधान मोदी

रायगडच्या काजळपुरा इमारत दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य कार्य सुरू असून त्यांना शक्य ती मदत पुरवली जाईल. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

महाड इमारत दुर्घटना
महाड इमारत दुर्घटना

By

Published : Aug 25, 2020, 8:00 AM IST

Updated : Aug 25, 2020, 1:42 PM IST

रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुः ख व्यक्त केले आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत असून जखमीच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. बचावकार्य सुरू असून शक्य ती सर्व मदत पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून दुः ख व्यक्त केले आहे. इमारत कोसळण्याची घटना वाईट आहे. याप्रकरणी एनडीआरएफकडून बचावकार्य कार्य सुरू असून त्यांना शक्य ती मदत पुरवली जाईल. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

तर या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत."

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील महाड दुर्घटनेप्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 18 अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंब राहत होती. इमारतीतील सर्व कुटुंब मुस्लीम धर्मीय होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

Last Updated : Aug 25, 2020, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details