नवी दिल्ली- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना विविध क्षेत्रातून मान्यवर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद
अरुण जेटली यांचे हुशार वकील, प्रतिष्ठीत मंत्री म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आज त्यांच्या जाण्याने दुःख झाले असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी -
अरुण जेटली यांची आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यांच्या जाण्याने मी एक जवळचा मित्र गमावला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.
राजनाथ सिंह -
जेटलीजी यांचे भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कायमच मोठे योगदान लाभले. त्यांच्या जण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे.
नितीन गडकरी -
अरुणजी यांच्या जाण्याचे दु:ख आहे. आमच्या दोन मोठ्या नेत्यांचे एकापाठोपाठ जाण्याने माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. त्यांचे राज्यसभेतली अनेक भाषणे लक्षात राहतील.