नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती स्वत: शक्तिकांत दास यांनी रविवारी दिली. सध्या ते घरातच विलगीकरणात राहून काम करत आहेत. तसेच आरबीआयमधील काम सामान्य मार्गाने सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. ट्विट मध्ये ते म्हणाले की, "मला कोरोनाची लागण झाली आहे. एसीम्प्टोमॅटिक आहे. मला पूर्णपणे निरोगी वाटत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी. मी घरातच क्वारंटाइन होऊन काम करत राहीन. रिझर्व बँकेचे काम पहिल्यासारखे सामान्य राहिल. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलिफोनद्वारे माझ्या सर्व उप गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी जोडलेला राहील.''