पाटणा - लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत बिहारमध्ये मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजलेली दिसते. पाटणा साहिब लोकसभा मतदार संघामध्ये आपल्या आवडत्या नेत्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
पाटणा साहिब या मतदार संघातून केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. २०१४च्या निवडणुकांमध्ये आर. के. सिन्हा यांनी येथून निवडणूक जिंकली होती. मात्र, यावेळी भाजपने रविशंकर प्रसाद यांना तिकीट दिल्यामुळे भाजपमध्ये २ गट तयार झाले आहेत.