नवी दिल्ली -केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आज जी -20 सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करतील. सायंकाळी साडेपाच वाजता ते भाषण करतील. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी 20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पंधराव्या परिषदेसाठी '21 व्या शतकातील संधींची जाणीव' या थीमची निवड केली आहे.
जी - 20 शिखर परिषद 2020 चे अध्यक्ष सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुल अझिज अल सऊद आहेत. जी -20 शिखर परिषद 2020, 21 ते 22 नोव्हेंबरला 2020 रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणार आहे.