बंगळुरु - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला ऑफ्रिकेच्या सेनेगलमधून रविवारी रात्री बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. भारत सरकारने १९ जानेवारी २०१९ मध्ये ऑफ्रिकेकडे पुजारीच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याच्यावर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ४९ गुन्हे दाखल आहे.
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी बंगळुरुत दाखल, आज न्यायालयात करणार हजर
राज्य पोलिसांसह एनआयए, रॉ आणि केंद्रीय अन्वेषण दल गेल्या १५ वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. खून, खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये सामिल असलेल्या हा डॉन २० वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला होता. १९ जानेवारी २०१९ मध्ये सेनेगल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर भारत सरकारने केलेल्या विनंतीनंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.
राज्य पोलिसांसह एनआयए, रॉ आणि केंद्रीय अन्वेषण दल गेल्या १५ वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. खून, खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये सामिल असलेला हा डॉन २० वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला होता. १९ जानेवारी २०१९ मध्ये सेनेगल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर भारत सरकारने केलेल्या विनंतीनंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.
कडक सुरक्षा व्यवस्थेत आज पुजारीला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. माडिवाला केंद्रामध्ये सध्या राज्य पोलीस, एनआयए, रॉ आणि केंद्रीय अन्वेषण पथक त्याची चौकशी करीत आहेत.