नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते रवीश कुमार यांची फिनलँडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली.
रवीश कुमार यांची फिनलँडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती - परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते रवीश कुमार
परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते रवीश कुमार यांची फिनलँडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
![रवीश कुमार यांची फिनलँडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती रवीश कुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7457674-926-7457674-1591174387414.jpg)
रवीश कुमार हे 1995 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. 2017 मध्ये त्यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली.
युरोपमधील फिनलँड हा भारतासाठी महत्वाचा देश आहे. फिनलँडमध्ये गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय व्यापार वाढीस लागला आहे. सुमारे 35 भारतीय कंपन्यांनी आयटी, आरोग्य सेवा, वाहन उद्योगात फिनलँडमध्ये गुंतवणूक केली आहे. तर 100 हून अधिक फिनलँड कंपन्यांनी ऊर्जा, वस्त्रोद्योग, ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतात काम केले आहे.