रायपूर (छत्तीसगड) - मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 20 सप्टें.) त्यांच्या निवासस्थानी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे कैबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या इतर मागासवर्गीय समुदायाला 27 टक्के व आर्थिक मागसवर्गीयांना 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी शिधापत्रकाच्या माहितीनुसार पटेल समितीच्या मार्गदर्शनाखाली अधिक माहिती संकलीत करण्याचा निर्णय झाला आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांसह सर्व मंत्र्यांनी राज्यातील शिधापत्रकानुसार खाद्य विभागाकडून मिळणारी माहिती ही विश्वसनीय असून या विभागाकडून सुटलेल्या कुटुंबियांची माहिती मिळविण्यात येणार आहे. सध्याच्या शिधापत्रकांपैकी 99 टक्के लोकांनी शिधापत्रासह आपला आधार नंबर बँक खाते लिंक केले आहे. यामुळे रेशनकार्ड्सना म्हणजेच शिधापत्रकाद्वारे गणना केली जाणार आहे.