पटना - शहरातील बोरिंग रोडजवळील नवरत्न ज्वेलर्सच्या दुकानात एका उंदराने हिऱ्याची कर्णफुले पळवून नेली आहे. ही घटना 4 मार्चला महाशिवरात्रीच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.
उंदराने पळवली हिऱ्याची कर्णफुले; सीसीटीव्हीत घटना कैद - पोलीस
पटना शहरातील बोरिंग रोडजवळील नवरत्न ज्वेलर्सच्या दुकानात एका उंदराने हिऱ्याची कर्णफुले पळवून नेली आहे. 4 मार्चला महाशिवरात्रीच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. ज्वेलर्सने याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली नसून हा सर्व प्रकार महादेवाचीच एक लीला आहे, असे ते सांगत आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी ज्वेलर्सने आपले दुकान बंद केले. मात्र, दुकान बंद करताना तो हिऱ्यांची कर्णफुले कपाटात ठेवणे विसरला. त्यानंतर रात्री सव्वा अकराच्या सुमारास उंदराने दुकानातील काउंटरवर चढून पाकिटात ठेवलेली कर्णफुले पळवली. दुसऱ्या दिवशी दुकानदार दुकानात पोहचल्यानंतर त्यांना हिऱ्याची कर्णफुले दिसेनाशी झाली. दुकानातील कामगारांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरा तपासला. यावेळी त्यांना हा सर्व प्रकार उंदराने केल्याचे समोर आले.
ज्वेलर्सने याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली नसून हा सर्व प्रकार महादेवाचीच एक लीला आहे, असे ते सांगत आहेत.