महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात जातीयवाद निर्माण करतोय- शर्मिष्ठा मुखर्जी - Sharmishta Mukherjee in nagpur

राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या भारतरत्न देण्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

शर्मिष्ठा मुखर्जी

By

Published : Oct 18, 2019, 7:01 PM IST

नागपूर - राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या भारतरत्न देण्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रश्नाला बगल देत काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मोदींची दुटप्पी भूमिका स्पष्ट केली.


माझ्या वडिलांना भारतरत्न लोक सेवे करिता देण्यात आला. त्यांनी 50 वर्ष केलेल्या नागरी सेवेबद्दल देण्यात आलेला हा सन्मान आहे. प्रणव मुखर्जी यांनी 50 वर्ष जी देशसेवा केली ती काँग्रेस मध्ये राहून केली. त्यामुळे मोदींचा काँग्रेसने 70 वर्षात काय केले हा प्रश्न दुटप्पी आहे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात जातीयवाद निर्माण करतोय- शर्मिष्ठा मुखर्जी


प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळण्यामध्ये काँग्रेसच देखील योगदान आहे, हे स्पष्ट होते. मात्र देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीयवाद निर्माण करत असून असंवैधनिक पद्धतीतून हे सगळं घडत असल्याचा आरोप देखील मुखर्जी यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details