नवी दिल्ली -देशात सुरू असलेल्या अनागोंदीला भाजपच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. नव्याने पारित झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. त्याबाबत बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशात सध्या असलेली परिस्थिती दुर्देवी आहे. या सर्व प्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच देशात अशांतता माजली आहे, अशी टीका अल्वी यांनी केली. दिल्लीमधील आंदोलनाच्या वेळी, पोलिसांनी अमित शाह यांच्या आदेशावरूनच विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये घुसून मारहाण केली. त्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी विद्यापीठामध्ये गेला नसता, असा आरोपही त्यांनी केला.