महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिवसेनेने काँग्रेसची समजूत काढावी - रणजित सावरकर - रणजित सावरकर संजय राऊत पाठिंबा

वि. दा. सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्या लोकांना अंदमानच्या तुरूंगात ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राऊतांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

रणजित सावरकर
रणजित सावरकर

By

Published : Jan 18, 2020, 6:31 PM IST

मुंबई - शिवसेनेने काँग्रेसला सावरकरांविरोधात वादग्रस्त आणि मानहानीकारक वक्तव्ये करण्यापासून रोखले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांनी हिंदूत्वावर केलेल्या वक्तव्याला पाठिंब्यालाही दिला आहे.


वि. दा. सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्या लोकांना अंदमानच्या तुरूंगात ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. शिवसेनेने कायम सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. आता महाराष्ट्रात त्यांची काँग्रेससोबत आघाडी आहेच, तर त्यांनी काँग्रेसच्या सावरकरविरोधी नेत्यांना समजावण्याचे काम करावे, असे रणजित सावरकर म्हणाले.

हेही वाचा - अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात, पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर घडली दुर्घटना
राऊतांनी आपल्या वक्तव्यातून थेट राहूल गांधींना आव्हान देण्याचे धाडस केले. त्यामुळे ते सावरकरांचा आणखी अपमान होऊ देणार नाही, अशी मला अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details