महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हॉकीची 'राणी' : सामान्य कुटुंबातल्या हरयाणवी कन्येनं पद्म पुरस्कारासह मिळवलं दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

4 डिसेंबर 1994ला शाहाबादेतील मारकंडा येथे राणीचा जन्म झाला. राममूर्ती आणि रामपाल अशी तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. रामपाल घोडागाडी चालवून कुटुंब चालवत असत. चौथीत असताना राणीने पहिल्यांदा हॉकी स्टिक हातात पकडली. नातेवाईकांनी अनेकदा विरोध करूनही मुलीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी तिला खेळण्याची परवानगी दिली. तिचा 13व्या वर्षीच भारतीय महिला हॉकी टीममध्ये घेण्यात आले.

हॉकीची 'राणी'
हॉकीची 'राणी'

By

Published : Oct 12, 2020, 6:02 AM IST

कुरुक्षेत्र - हरयाणाच्या कुरुक्षेत्रातील शाहाबाद या छोट्या गावातून आलेल्या राणी रामपाल हिने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. तिला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या वडिलांना आकाश ठेंगणं झालं. तिला 'वर्ल्ड गेम्स अ‌ॅथलीट ऑफ द ईयर' हा पुरस्कारही मिळाली आहे.

हॉकीची 'राणी'

शाहाबादेतील मारकंडा येथे 4 डिसेंबर 1994 ला राणीचा जन्म झाला. राममूर्ती आणि रामपाल अशी तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. रामपाल घोडागाडी चालवून कुटुंब चालवत असत. चौथीत असताना राणीने पहिल्यांदा हॉकी स्टिक हातात पकडली. नातेवाईकांनी अनेकदा विरोध करूनही मुलीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी तिला खेळण्याची परवानगी दिली. तिचा 13व्या वर्षीच भारतीय महिला हॉकी टीममध्ये घेण्यात आले.

हॉकीची 'राणी'

राणी चौथीत असताना तिनं मैदानावर मुलींना हॉकी खेळताना पाहिलं आणि तिनेही हॉकी खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू राणीने हॉकीमध्ये नाव कमावले आणि ती भारतीय संघाची कर्णधार बनली. ती जसजशी खेळात पुढे जाऊ लागली, तसतशी घरची परिस्थितीही सुधारू लागली. राणीच्या कर्तृत्वामुळं तिचं छोटेसं गाव शाहबाद, हरयाणा आणि भारताचंही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दुमदुमलं. राणीला भीम पुरस्कार, अर्जुन पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय.

राणीला पद्म पुरस्कार मिळाल्यानं आपल्याला खूप आनंद झाला, असं तिचे वडील रामपाल म्हणाले. त्यांनी मोठ्या अडचणींमधून कष्टानं आणि जिद्दीनं मार्ग काढत मुलीला इथपर्यंत आणले आहे.

हॉकीची 'राणी'
हॉकीची 'राणी'

पद्मश्री पुरस्कार -

राणीला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या वडिलांना खूप आनंद झाला. मोठ्या कष्टातून त्यांनी त्यांच्या मुलीला इथपर्यंत येण्यात मदत केली आहे. राणीने स्वच्छेने आपल्या नावापुढे केवळ वडिलांचे नाव लावले आहे. ती 'राणी रामपाल' एवढेच स्वतःचे नाव लावते.

एक नजर राणी रामपालच्या करिअरवर -

  • राणीला 2013मध्ये ज्युनियर हॉकी विश्वकरंडकात 'प्लेयर ऑफ दि टूर्नामेंट'चा किताब मिळला.
  • राणी 2010मध्ये हॉकी विश्व करंडकात खेळणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू बनली. तेव्हा तिचे वय केवळ 15 वर्षे होते.
  • तिने 14व्या वर्षी तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
  • तिने 2009मध्ये आशिया करंडकादरम्यान भारतला रजत पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
  • राणी 2010च्या राष्ट्रमंडल खेल आणि 2010 च्या आशिया करंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघात होती.
  • तिला सर्वोत्कृष्ट लहान वयाच्या फॉरवर्ड खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
  • 2013मध्ये भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. हे भारताला तब्बल ३८ वर्षांनी विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत मिळालेले पदक होते.
    हॉकीची 'राणी'
    हॉकीची 'राणी'

ABOUT THE AUTHOR

...view details