महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बहुमत चाचणीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता' - महाराष्ट्र सत्ता पेच

शरद पवारांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास त्यांना केंद्रामध्ये २ मंत्रीपदे मिळू शकतात. सुप्रिया सुळे या मंत्री बनू शकतात. सत्तेसाठी नाहीतर जनतेच्या हितासाठी तरी पवारांनी एनडीएला पाठिंबा द्यायला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे.

रामदास आठवले

By

Published : Nov 25, 2019, 10:50 AM IST

कानपूर - शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या मागे न लागता एनडीएला पाठिंबा द्यावा. हे देशाच्या हितासाठी योग्य आहे. इतकेच नाहीतर ३० नोव्हेंबरला बहुमत चाचणीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते कानपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

'बहुमत चाचणीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता'

माझे आमदार एनडीएसोबतच आहे. तसेच आम्ही सर्वजण बहुमत सिद्ध कसे करता येईल? यावर लक्ष केंद्रीत करीत आहोत. मात्र, मला अनेक आमदार ओळखतात. त्यामुळे फुटण्याची शक्यता आहे, असेही आठवले म्हणाले.

शरद पवारांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास त्यांना केंद्रामध्ये २ मंत्रीपदे मिळू शकतात. सुप्रिया सुळे या मंत्री बनू शकतात. सत्तेसाठी नाहीतर जनतेच्या हितासाठी तरी पवारांनी एनडीएला पाठिंबा द्यायला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे. मी शरद पवारांची सन्मान करत असल्याचे देखील आठवले म्हणाले.

राज्यात सत्तानाट्य चांगलेच रंगले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचा हा शपथविधी कायदेशीर नसल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच लवकरात लवकर बहुमत चाचणी सिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details