नवी दिल्ली - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पाटणा दौऱ्यावर आहेत. बिहार विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पक्ष लढवणार असून रणनीती ठरवण्यासाठी आपण बिहार दौऱ्यावर असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचे पथक तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल आणि सुशांतला न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार - रामदास आठवले - bihar election updates
बिहार विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पक्ष लढवणार असून रणनीती ठरवण्यासाठी आपण बिहार दौऱ्यावर असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचे पथक तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल आणि सुशांतला न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
नवा कृषी कायदा सर्व राज्यात लागू करण्याचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे महराष्ट्र सरकार हा कायदा लागू करणार नसेल. तर आम्ही त्याविरोधात आंदोलन करू, असे रामदास आठवले म्हणाले.
तथापि, बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.