महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'राहुल गांधीना निवडून केरळच्या जनतेनं चूक केली' - रामंचद्र गुन्हा बातमी

ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी राहुल गांधींवर घराणेशाहीवरून निशाणा साधला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले.

रामंचद्र गुन्हा
रामंचद्र गुन्हा

By

Published : Jan 18, 2020, 9:50 AM IST

Updated : Jan 18, 2020, 12:06 PM IST

तिरुअनंतपूर -ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी राहुल गांधींवर घराणेशाहीवरून निशाणा साधला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. मोदींसमोर राहुल गांधींना राजकारणात काहीही संधी नसून त्यांना खासदार पदी निवडून केरळच्या जनतेने चूक केली, असे गुहा म्हणाले.

'नरेंद्र मोदी स्वकष्टाने मोठे झालेत. त्यांनी १५ वर्ष राज्याचा कारभार पाहिला असून त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, ते अतिशय कष्ट करणारे असून युरोपमध्ये सुट्टीला जात नाहीत, असे म्हणत इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले. ते केरळमधील कोझिकोड येथे आयोजित साहित्य संमेलनात बोलत होते.

जर २०२४ मध्ये तुम्ही राहुल गांधींनाच निवडून देण्याची चूक केली तर त्याचा फायदा कदाचित नरेंद्र मोदींनाच होईल. भारताच्या जडणघडणीत केरळचे योगदान मोठे आहे. मात्र राहुल गांधींना निवडण्याचा निर्णय चुकीचा होता” मी वैयक्तिकपणे राहुल गांधींच्या विरोधात नाही. राहुल गांधींची वागणूक चांगली असून ते सभ्य आहेत, मात्र, भारतीय तरुणांना घराणेशाहीतील ५ वा वंशज नेता म्हणून नको आहे, देशातील तरूण घराणेशाहीला कंटाळले आहेत, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.

रामचंद्र गुहांनी मोदींची स्तुती करुन त्यांना एकप्रकारे समर्थन दिले आहे. तर राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नुकतेच कर्नाटकमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील गुहा रस्त्यावर उतरले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. सीएए कायद्याविरोधात त्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र, त्यांनी आता मोदींची स्तुती केली आहे.

Last Updated : Jan 18, 2020, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details