मुंबई - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी ८० आणि ९० च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. यामध्ये रामानंद सागर लिखित आणि दिग्दर्शित 'रामायण' ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर सुरू झाली आहे. गेल्या 16 एप्रिलला रामायणाची जगातील सर्वांत जास्त पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून नोंद झाली आहे. तब्बल 7.7 कोटी प्रेक्षक रामायण पाहात होते.
28 मार्चला रामायण ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित झाली. ही मालिका मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक वेळा पाहिली जाणारी मालिका ठरली असून हीने सर्व रेकार्ड तोडले आहेत. या मालिकचे पहिले प्रसारण 25 जानेवरी 1987 ते 31 जुलै 1988 दरम्यान झाले होते. त्यानंतर जुन 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये सर्वांत जास्त पाहिली जाणारी मालिका म्हणून हीची नोंद झाली होती.