महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2020, 11:16 AM IST

ETV Bharat / bharat

'आजचा दिवस ऐतिहासिक, माझ्या हृदयाजवळचं स्वप्न साकार होतयं'

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर भूमीपूजन सोहळा आज होणार आहे. 1990 च्या दशकात सुरू झालेल्या राम मंदिर चळवळीतील आघाडीचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मंदिराचे भूमिपूजन हे माझ्या हृदयाजवळ असलेले एक स्वप्न आज पूर्ण होत आहे, असे अडवाणी म्हणाले.

लालकृष्ण अडवाणी
लालकृष्ण अडवाणी

नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर भूमीपूजन सोहळा आज होणार आहे. 1990 च्या दशकात सुरू झालेल्या राम मंदिर चळवळीतील आघाडीचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मंदिराचे भूमिपूजन हे माझ्या हृदयाजवळ असलेले एक स्वप्न आज पूर्ण होत आहे. सर्व भारतीयांसाठी हा ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे, असे अडवाणी म्हणाले.

भगवान रामचे सद्गुण आत्मसात करण्यासाठी हे मंदिर सर्व भारतीयांना प्रेरणा देईल. माझा विश्वास आहे की, राम मंदिर सर्वांना न्याय मिळवून देणारे मजबूत, संपन्न, शांततापूर्ण आणि सुसंवादी राष्ट्र म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल. कोणाकडेही दुर्लक्ष किंवा द्वेष केला जाणार नाही. जेणेकरून आपण रामराज्यातील खरोखर सुशासनाचे प्रतीक होऊ शकू, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले.

कधीकधी महत्वपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बराच वेळ लागतो. परंतु, जेव्हा ती शेवटी पूर्ण होतात, तेव्हा केलेली प्रतीक्षा सार्थक ठरते. आज पंतप्रधान मोदी राम मंदिराचा पाया घालत आहेत. हा केवळ माझ्यासाठीच नाही, तर सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे, असे अडवाणी म्हणाले.

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्याची भाजपाची इच्छा आणि मिशन होते. श्री राम मंदिर मजबूत समृद्ध म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल. श्री राम यांनी भारत आणि तेथील जनतेला सदैव आशीर्वाद द्यावे. जय श्री राम, असे अडवाणी म्हणाले.

या शुभ प्रसंगी, रामजन्मभूमी चळवळीसाठी मोलाचे योगदान आणि बलिदान देणार्‍या संत, नेते आणि लोकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छित आहे. मंदिरामुळे भारतीयांमधील संबंध दृढ होण्यास बरीच प्रगती होईल. श्री. राम यांना भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या परंपरेत एक प्रतिष्ठित स्थान आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचे बांधकाम शांततेच्या वातावरणात सुरू आहे, असे आडवाणी म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. रामनामाचा गजराने आणि लखलखती विद्युत रोषणाईने अयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अयोध्येत सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष सुरू आहे. दुर्मीळ आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी 175 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात 135 संत-महंत असून, उर्वरित 40 विशेष पाहुणे असतील. सर्वत्र कडेकोट पहारा करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details