महाराष्ट्र

maharashtra

अयोध्या खटला: 'मी फक्त हिंदु मंदिराचा भाग पाडला, फाशीची शिक्षा दिली तरी मान्य'

By

Published : Jun 9, 2020, 8:28 PM IST

मशिद विवादीत जागण्यावर असल्याचा एकही पुरावा नाही. मी फक्त हिंदू मंदिराचा भाग पाडल्याचे डॉ. वेदांती यांनी स्पष्ट केले आहे.

राम विलास वेदांती
राम विलास वेदांती

लखनौ - बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून आरोपींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. यातील एक आरोपी डॉ. राम विलास वेदांती यांचा जबाब सीबीआयने मंगळवारी घेतला. राम मंदिर कोणत्याही परिस्थितीत बांधण्यात येईल, असे वेंदाती यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.

डॉ. राम विलास वेदांती

जबाब घेण्यासाठी वेदांती यांनी विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांच्यापुढे हजर करण्यात आले होते. भारतीय दंडविधान कायद्यानुसार कलम 313 नुसार आरोपींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. यानुसार आरोपीला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर बोलण्याची संधी मिळते.

जबाब नोंदविल्यानंतर ईटीव्ही भारतशी बोलताना वेदांती म्हणाले, मशिद विवादीत जागेवर असल्याचा एकही पुरावा नाही. मी फक्त हिंदू मंदिराचा भाग पाडला, ज्यामध्ये भगवान गणेश, विष्णू आणि दुर्गा मातेचा समावेश होता. राम लल्लाच्या जागेवर मशिद असल्याचे पुरावे नाहीत. मी फक्त हिंदु मंदिराचे भाग पाडला. हिंदु मंदिराचा भाग पाडल्याबद्दल जर न्यायालय मला फाशीची शिक्षा देणार असतील तर मी मरायला तयार आहे, असे वेदांती म्हणाले.

बाबरी मशिद डिसेंबर 1992 ला कारसेवकांनी पाडली. प्राचिन राम मंदिराच्या जागी मशिद असल्याचे म्हणत हजारोंच्या जमावाने ढाचा पाडला.

ABOUT THE AUTHOR

...view details